चारा छावण्या, टँकर तत्काळ सुरू करा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा परिषदेतील आढावा बैठकीत आदेश!

Foto

औरंगाबाद : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सांघिक कामगिरीनेच दुष्काळावर मात करता येईल, पिण्यासाठी पाणीटँकर रोजगार व चारा छावण्यांची मागणी होताच त्यांची पूर्तता करा, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषदेत आयोजित टंचाई आढावा बैठकीत केली. यावेळी आमदार संदिपान भुमरे, प्रशांत बंब, अब्दुल सत्तार, अतुल सावे, संजय सिरसाट, खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे तसेच सर्वच विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती होती. 

ज्या ही वाडी वस्ती तांड्यातून पाणी टँकरची मागणी आल्यास  त्याची पूर्तता 12 तासात करा, चारा छावण्यासाठी मुबलक पाणीपुरवठा करा, चारा छावण्या मागणीचीही तत्काळ पूर्तता करा, त्यांना दर तीन दिवसांनी धानदेश द्या, ज्याही गावात रोजगाराची  मागणी होईल. त्यांना रोजगार हमी योजनेचे काम उपलब्ध करून द्या, धरणातील गाळ काढण्यासाठी शासकीय तसेच भाडेतत्वावर पोकलॅन सक्रीय करा, वैजापूर तालुक्यातील भटाणा व कन्‍नड तालुक्यातील बनशेंद्रा येथे पाण्याची तीव्र पाणीटंचाई आहे, तेथे विहिरी खोदण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करा, पिकविम्याचे पैसे तत्काळ द्या, अशा सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.